हस्ती पाईप रद्द करा-औसेकरांचा लढा
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील हद्दवाढ भागात पि.व्ही.सी. ची पाईपलाईन आहे. ती सारखी नादुरुस्त होत असते. त्यामुळे आम्हाला पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होते त्यामुळे अनेक वर्षापासून नागरीकांची मागणी होती की, लोखंडी कायमस्वरूपी पाईपलाईन करण्यात यावी आता आम्हाला असे निदर्शनास आले आहे की, या लोखंडी पाईपलाईन ऐवजी हस्ती पाईप जे की, सद्या तात्पुरता कामासाठी वापरली जाते.अशी पाईलाईन वापरण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही सदरील पाईपलाईन ही हस्तीची करण्यात येऊ नये.
लोखंडी पाईपलाईनने समसमान पाणी मिळू शकते व योग्य दाबाने पाणी पुरवठा होतो परंतु हस्ती पाईपलाईनने पाण्याचा दाब योग्य राहत नाही किंवा जागोजागी पाईप लाईन दबु शकते त्यामुळे पाणीपुरवठामध्ये अंत्यत अडचणी निर्माण होऊ शकतात.हस्ती पाईप लाईन केल्यामुळे नळ धारकांना मिळणार-या पाण्याचा दाब हा कमी होऊन नळ धारकांना पाणी कमी मिळू शकते. हस्ती पाईप हे लिकीज होऊन नळ धारकांना पाणी कमी मिळू शकते. हस्ती पाईपलाईन मार्फत नळ घेताना त्रास होऊ शकतो. व लिकेज ही होऊन धारकांना पाणी कमी मिळू शकते. तसेच हस्ती पाईपलाईनच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो .
तरी नविन हद्दवाढीत व इतर ठिकाणी हस्तीची पाईप लाईन न करता केवळ लोखंडी पाईप करावी यासाठी आज सर्व पक्षीय तर्फे औसा नगर पालिकेच्या समोर हस्ती पाईप रद्द करा यासाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
.
0 टिप्पण्या