औसा शहरातील जून्या भागात पाण्याची सोय करा -उमर पंजेशा

 औसा शहरातील जून्या भागात पाण्याची सोय करा -उमर पंजेशा 


औसा प्रतिनिधी 

औसा शहरातील विविध 

 अहवाल क्र.४घरकुल मंजूर यादीतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर कोणतीही अट न घालता पहिला हफ्ता टाकण्यात यावा.

 मोमीन गल्ली येथील अलीम करपुडे यांच्या घरा पासून वाजीद चौधरी यांच्या घरा पर्यंत दहा बारा वर्षांपासून नळाला पाणी येत नसून नवीन पाइप लाईन टाकून पाणी पुरवठा सुरळीत करावे.

सतिष नाईक ते संतोष वर्मा यांच्या घरा पर्यंत  नळाला पाणी येत नसून नवीन पाईप लाईन टाकून पाणीपुरवठा सुरळीत करावे .

 सुरतशाह शाळेपासून मोमीन गल्ली पर्यंत नालितून टाकण्यात आलेली तात्पुरती हस्ती पाईप लाईन काढून नविन जमिनीत पुरून पाणीपुरवठा योग्य दाबाने सुरू करावे.

जुन्या औसा शहरातील ज्या भागात नळाला पाणी येत नाही अथवा योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नाही अश्या सर्व भागाचे सर्वे करुन  ४३ कोटीच्या नवीन  करण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामामध्ये अलीम करपुडे ते वाजीद चौधरी यांच्या घरापर्यंत,सतीष नाईक ते संतोष वर्मा  यांच्या घरापर्यंत व औसा जून्या शहरातील  जा भागात नळाला पाणी येत नाहीं अशा सर्व भागात सर्वे करुन  त्या भागातील नागरिकांच्या  नळाला पाणी येईल अशी व्यवस्था करावी .

अश्या  विविध मागण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष उमर पंजेशा यांनी मुख्याधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

याप्रसंगी इस्माईल (हाजी)शेख, जहीर शेख, बागवान बिरादरी, व औसा शहरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या