औसा पंचायत समितीच्या वतीने वृद्ध कलावंतांचा सन्मान .
औसा प्रतिनिधी
ह भ प प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांच्या अखिल भारतीय वारकरी मंडळ औसा शाखा आणि पंचायत समिती औसा यांच्या संयुक्त विद्यमाने औसा तालुक्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांचा सन्मान सोहळा गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता पंचायत समिती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. ह भ प दत्तात्रेय पवार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिमन्यू पवार, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या औसा शाखेतर्फे ह भ प दत्तात्रय पवार गुरुजी यांना वारकरी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते तालुक्यातील नोंदणीकृत वृद्ध कलावंतांना प्रमाणपत्र शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडू महाराज भादेकर यांनी केले दिनकर निकम महाराज यांनी औसा येथे वारकरी भवन उभारण्याची मागणी केली. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज मेत्रे, यांनीही आपले मनोगत व्यक्त करून वारकरी बांधवांच्या गौरव केला तसेच वारकरी संप्रदायाचा वारसा जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे यावेळी मान्यवरांनी स्पष्ट केले. नोंदणीकृत वृद्ध कलावंताच्या सन्मान सोहळापूर्वी भावगीत भक्तीगीत आणि कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री सिद्रामापारा राचट्टे, गोरोबा कुरे, गोविंद तावसे, आत्माराम मिरकले, सतीश जाधव, हरिभाऊ शिंदे यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. याप्रसंगी सरपंच संघटनेचे अध्यक्ष विष्णू कोळी, सूर्यकांत शिंदे, विठ्ठल बेड जवळगे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी औसा शहर व तालुक्यातून शेकडो वृद्ध कलावंत महिला पुरुष तसेच भजनी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या