मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी समाजाचे निदर्शने.
मराठा समाजाला ओबीसीतून जे आरक्षण देण्यात आले त्याला विरोध करण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन.
औसा प्रतिनिधी
औसा.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारकडून काढण्यात आलेला बेकायदेशीर व अन्यायकारक अध्यादेश रद्द करण्यासाठी व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात आले त्याला विरोध करण्यासाठी म्हणून हे आरक्षणाच्या विरोधात आज औसा तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांच्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये सगळयात महत्त्वाचं जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सांगत होते ओबीसीला कसलाही धक्का न लागता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत पण शेवटी ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येत आहे.मूळ ओबीसी समाजावर हा अन्यायच होत असून याला विरोध करण्यासाठी म्हणून संपूर्ण औसा तालुक्यातून आज विविध जाती धर्माचे जे ओबीसी बांधव आहेत त्यांच्या वतीने सकल ओबीसी म्हणून एकत्रित मिळून दिनांक 1 फेब्रुवारी गुरुवार रोजी औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सकल ओबीसी बांधव उपस्थित होते.
0 टिप्पण्या