दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा बोरफळ येथे शुभारंभ
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत दिवाळीच्या सणासाठी देण्यात येणारा आनंदाचा शिधाव वाटपाचा शुभारंभ बोरफळ येथे बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सौ. शोभाताई अभिमन्यू पवार यांच्या हस्ते व जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे तहसीलदार भरत सूर्यवंशी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार लाला कांबळे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच सौ सुरेखा बजरंग जमादार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राज्य शासनाच्या वतीने दिवाळी गुढीपाडवा गौरी गणपती उत्सवामध्ये आनंदाचा शिधा वाटप उपक्रमाचे जनतेतून स्वागत होत आहे. यावेळी औसा तालुकास्तरीय दक्षता समितीचे सर्व श्री भीमाशंकर मिटकरी, विनोद चौधरी, विकास कटके, संजय कुलकर्णी, सौ. प्रमिला कांबळे, सौ. माधुरी पाटील, रेवणसिद्ध भागुडे, जिल्हा ग्राहक पंचायतीचे अशोक देशमाने, भैरू यादव सर अनुसया यादव, मंडळ अधिकारी गरगट्टे, तलाठी ए.पी. हाळनोर यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा बोरफळ येथून शुभारंभ झाला असून सौ. शोभाताई पवार व जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे यांनी यावेळी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. प्रारंभिक तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
0 टिप्पण्या