औसा येथे वारकरी साहित्य परिषदेचे संमेलन व विठ्ठल पुरस्काराचे उद्या वितरण..
औसा प्रतिनिधी
वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक व विठ्ठल काकाजी यांच्या संकल्पनेतून ह. भ. प. माधव महाराज शिवणीकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय उंबडगाव रोड औसा येथे सकाळी 11 वाजता वारकरी साहित्य परिषदेचे बाराव्या वर्धापन दिनानिमित्त वारकरी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वारकरी साहित्य संमेलनामध्ये विविध कार्यक्रमासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन ना. संजय बनसोडे यांच्या शुभहस्ते होणार असून खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहे. आमदार अभिमन्यू पवार हे वारकरी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून आमदार रमेश आप्पा कराड उपस्थित राहणार असून माजी आमदार दिनकरराव माने यांच्या हस्ते वारकरी दिंडीचे पूजन होणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना मरणोत्तर विठ्ठल पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून प्रचलित काळामध्ये वारकरी संप्रदायाचे काम उत्कृष्टरित्या करणाऱ्या कीर्तनकारांचा विठ्ठल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमांमध्ये आदर्श सरपंच आदर्श शेतकरी व आदर्श पत्रकारांना विठ्ठल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ची माहिती संयोजक सई ताई गोरे, श्रीधर धुमाळ, सतीश खडके, वसंत कदिरे, यशवंत शिंदे, व्यंकट पवार, सुखाचार्य साळुंखे, बळी दळवे, चंद्रकांत राऊत, गणेश सावंत सर भागवत गोरे, रामराजे पवार, नरहरी माळी, नेताजी जगताप, काका माळी, ज्ञानेश्वर आजणे, रमेश काकडे, अंगत जाधव यांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या