आम आदमी पार्टीचा स्नेह मिलन व पक्ष बांधणीसाठी बैठक संपन्न..

 आम आदमी पार्टीचा स्नेह मिलन व पक्ष बांधणीसाठी  बैठक संपन्न..




औसा प्रतिनिधी मुखतार मणियार


आम आदमी पार्टीचा वर्धापन दिन,व संविधान दिन व तसेच 26/11च्या शहिदांना श्रद्धांजली च्या निमित्ताने व आम आदमी पार्टीच्या वतीने लातूर येथे स्नेह मिलन व पक्ष बांधणी व पार्टीची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या निमित्ताने आज  आम आदमी पार्टीचा 11 वा  वर्धापन दिनानिमित्त व 26 नोव्हेंबर रविवारी दुपारी तीन वाजता लातूर येथील पत्रकार भवन येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व तसेच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व तसेच 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना अभिवादन करून हा आम आदमी पार्टीच्या वतीने  स्नेह मिलन व पक्ष बांधणी व पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बैठक घेण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी पार्टीच्या पुढच्या कामासाठी नेमके काय केले पाहिजे यासाठी  थोडक्यात बैठक घेऊन चर्चा करण्यात  आली.   या बैठकीमध्ये आगामी काळात आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. व या पार्टीत प्रत्येक गावा गावात आम आदमी पार्टीने संभासद नोंदणी करून येणाऱ्या काळात कार्यकर्ते  कसे वाढविले पाहिजे यासाठी प्रत्येकांनी आपापल्या जबाबदारीने  काम केले पाहिजे. असे या बैठकीत सांगितले. यावेळी सुधीर देशमुख, वसंत दगडु माने, भागवत जगताप, नागनाथ मोरे, मुख्तार मणियार,दानीश शेख, अंकूश लोंढे, समाधान सोनवणे, शिवाजी आचार्य, अब्बास शारवाले,खादर शेख, सोपान लोहारे शुभम माने, मंगेश पाटील, रामचंद्र सुर्यवंशी, आकाश माधवराव,राजेश मंगोली, अनुराधा मंगोली, राकेश कांबळे, विवेक वाघमारे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या