मनोज जरांगे पाटील याची विराट सभा
सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती
औसा प्रतिनिधी
औसा येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्याच्या दृष्टीने सभेच्या तयारीची माहिती देण्यासाठी आज दिनांक 28 नोव्हेंबर मंगळवार रोजी 1 वाजता सकल मराठा समाज औसाच्या वतीने शासकीय विश्रामगृह औसा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे 10 डिसेंबर रोजी औशात येणार आहेत. व त्यांची सभा औसा तालुक्यात दोन ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची सभा औसा येथे होणार आहे यासाठी औसा तालुक्यातील गावा गावात हि माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. सकल मराठा समाजाच्यावतीने 10 डिसेंबर रोजी सकाळी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या समाधी स्थळी अभिवादन करुन दुपारी 12 वाजता उटगे मैदान औसा येथे व त्यानंतर किल्लारी येथे अशा दोन ठिकाणी मराठयांची विराट सभा घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे. व या सभेला एक लाखाहून अधिक मराठे येतील. व हि सभा लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सभा होईल असा विश्वास विजय कुमार गाडगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी या पत्रकार परिषदेस औसा सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या