भारत न्यूझीलंड वर विजय मिळवल्याबद्दल औशात जल्लोष..
औसा प्रतिनिधी
वानखेडे स्टेडियमवर वनडे क्रिकेट भारत न्यूझीलंड सेमी फायनल मॅच होता.या
सेमी फायनल मॅच मध्ये भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड वर विजय मिळवून भारत फायनल मॅच मध्ये आला .यावेळी विराट कोहलीने वनडे मधील आपले 50 वे शतक ठोकले त्यांने ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर अजुन एक मोठा इतिहास रचला आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या या सलग दहाव्या विजयानंतर टीम अंतिम सामन्यातही विजयश्री खेचून व सर्व देशवासीयांचे मने जिंकत सेमी फायनल मॅच मध्ये विजय मिळवल्याबद्दल औसा येथील माजी नगराध्यक्ष मेहराज शेख व प्रभागातील तरुणांनी जल्लोष साजरा केला.
0 टिप्पण्या