मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा..
औसा प्रतिनिधी मुखतार मणियार
महाराष्ट्रातील मराठा समाजास अन्य मागास प्रवर्गात समाविष्ठ करुन कुणबी प्रमाणपत्र देणेबाबतच्या आरक्षण आंदोलनास अखंड मुस्लीम समुदायातर्फे जाहीर पाठींबा देण्यात आला.याचे सविस्तर वृत्त असे
सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर मराठा समाजास अन्य मागास प्रवर्गात समाविष्ठ करुन कुणबी मराठा प्रमाणपत्र द्यावे .या आरक्षणासंदर्भात आंदोलने करण्यात येत आहेत. यासंदर्भात आमरण उपोषणास बसलेले श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ औसा येथे होत असलेल्या साखळी उपोषणास अखंड मुस्लीम समुदाय व महाराष्ट्र मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचा जाहीर पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
तरी कायद्याच्या चौकटीत बसवून निरंतर टिकेल असे आरक्षण मराठा समाजास देण्यात यावे अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मौलाना अमजदसाब,खारी रफीक सिराजी, मौलाना हारुन इरशादसाब, मुफ्ती बिलाल,शेख शकील,शेख रशीद, डॉ अफसर शेख, सय्यद मुजफ्फर अली इनामदार अँड. समीयोद्दीन पटेल, अँड फेरोजखां पठाण, अँड.शाहनवाज पटेल, अजहरुल्ला हाशमी, मुजम्मील शेख, शेख करीम, सनाऊल्ला शेख, दिलावर तत्तापुरे,काझी साजीदअली, शेख फय्यूम,बासीद शेख,शफीयोद्दीन नांदुरगे, सिद्दीकी मुखीस, महंमद युनुस चौधरी,शेख अ.वारीस, कुरेशी अ.वहीद,आफजल मणियार,हुजेफा मणियार, अँड.एम.एम.शेख, मोहम्मद हबीब,हाफीज अबरार मणियार, शेख सादेख, शेख जानीमिया आदि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या