नागरसोगा येथील सप्ताहात श्रीकृष्ण जन्माचा सोहळा रंगला.
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील नागरसोगा ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या सहकार्याने दिनांक 15 ते 22 जुलै 2025 या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सप्ताह कालावधीमध्ये नामवंत कीर्तनकारांचे नामसंकीर्तन आणि ह भ प श्रीदेवी दिगंबर शिंदे यांच्या अमोघ वाणीतून श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये नागरसोगा येथील हनुमान मंदिरासमोर हजारो महिला पुरुष भक्तगण कथा कार्यक्रमांमध्ये तल्लीन होऊन जातात. शनिवार दिनांक 19 जुलै रोजी श्रीकृष्ण जन्माचा सजीव देखावा अत्यंत सुरेखपणे तथा कार्यक्रमांमध्ये दाखविण्यात आला. श्रीकृष्ण जन्माच्या सजीव देखाव्यामध्ये हजारो महिला पुरुषांनी नाच गाण्याचा आनंद घेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ह भ प श्रीदेवी दिगंबर शिंदे यांच्या श्रीमद् भागवत कथेने भावीक भक्त मंत्रमुग्ध होत आहेत.
रविवारी रुक्मिणी स्वयंवर
,...............
अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमांमध्ये रविवार दिनांक 20 जुलै रोजी रुक्मिणी स्वयंवराचा सजीव देखावा साकारण्यात येणार असून नागरसोगा व परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह संयोजन समिती नागरसोगा यांनी केले आहे.
0 टिप्पण्या