औसा येथे गुरुपौर्णिमा संगीत महोत्सव..

 औसा येथे

गुरुपौर्णिमा संगीत महोत्सव..



औसा  प्रतिनिधी

7 जुलै. 2025

         औसा  येथील माऊली संगीत विद्यालय आणि माऊली प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने मुक्तेश्वर मंदिरात रविवारी ( 13 जुलै ) रोजी गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

          यावेळी पं.शिवरूद्र स्वामी गुरुजी यांच्या माऊली संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांसह विश्वनाथ धुमाळ, राजाभाऊ जंगाले, खंडू क्षीरसागर, अँड. भालचंद्र पाटील, अविनाश यादव, अनिल यादव, हणमंत लोकरे, आशा सोमवंशी अशा अनेक लहान थोरांचे गायन सादर होणार आहे.

       चैतन्य पांचाळ, कैवल्य पांचाळ,पांडुरंग केसरकर, रितेश कदम आणि ओमकार  चव्हाण यांची हार्मोनियम तबला वादनाची साथसंगत होणार आहे.

         कार्यक्रमाचे उद्घाटन धनंजय कोपरे, दीपक देवडिकर, इरंन्ना  मंगरुळे, प्रा. शिवरूद्र मुर्गे, डॉ. अमर धाराशिवे यांच्या हस्ते होणार आहे.

       या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या