औसा शहरातील जुना बसस्थानकात खड्डे पडलेले बुजवावे व सर्व डेपोच्या बसेस जुन्या बसस्थानकात यावे - सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
आपणास अनेकवेळा जुन्या बसस्थानकावर बसेस येण्यासाठी मागणी करुनही गाड्या आणण्यात येत नाहीत. तरी सर्व डेपोच्या गाड्या जुन्या बसस्थानकावरुनच येऊन जाव्यात कारण सदर भागात शाळा असून विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लगत आहे. कंट्रोलरला विचारणा केल्यास ते नविन बसस्टँड येथे जाण्याबाबत कळवून उडवा उडवीचे उत्तरे देत आहेत. तसेच कांही बसेस तर नविन बसस्टँडवर न येता हाशमी चौक येथूनच मार्गस्त होत आहेत. वाहकांना विचारणा केल्यास ते जादा गाडी असल्याचे उत्तरे देत आहे.
तसेच बसस्थानकाचे परिसर हे सद्याच्या पावसाळ्यामुळे खराब झाले असून पाणी साचुन तेथे तळ्याचे स्वरुप आले आहे त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तरी सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या जुन्या बसस्थानकात जाऊन येण्याबाबत आदेशीत करावे तसेच परिसरातील खड्डे बुजवण्यात यावेत. व केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरुपात देण्यात यावी अन्यथा एम आय एम च्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी आगार प्रमुख औसा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या