औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम..

 औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वच्छता मोहीम..




आ. अभिमन्यू पवारांसह संचालक मंडळांचा सहभाग 


पणन विभागाची शंभर दिवस स्वच्छता मोहीम..



औसा प्रतिनिधी..


औसा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत पणन विभागामार्फत राज्यभर स्वच्छ बाजार समिती आवार अभियान राबविण्यात येत आहे.या अंतर्गत औसा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात आवारात (दि.५) एप्रिल रोजी प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले अभियानाचे उद्घाटन आमदार अभिमन्यू पवार पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


                                    येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात अशावेळी बाजार समिती आवारात पालापाचोळा यासह मोठ्या प्रमाणात घनकचरा संचित होत असतो. बाजार आवारात शेतमाल खरेदी विक्रीसाठी दररोज शेकडो शेतकरी, हमाल ,आडते ,व्यापारी व इतर अनुषंगिक घटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते बाजार समिती आवारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा पडून सर्व घटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असतो.त्या अनुषंगाने औसा बाजार समिती येथे आमदार अभिमन्यू पवार,सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे,सहाय्यक निबंधक रमेश सगर, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, अरविंद कुलकर्णी, सुनील उटगे ,संतोष मुक्ता, संचालक प्रकाश काकडे, युवराज बिराजदार, रमेश वळके गोविंद भोसले, धनराज जाधव ,सुरेश औटी, झिरमिरे ,ईश्वर कुलकर्णी ,शंकर पुंड, विजयकुमार , सदाशिव जोगदड, विजय कुमार जोशी, अडत असोसिएशनचे अध्यक्ष शिवलिंग औटी, उपाध्यक्ष गोविंद दळवे ,सचिव महेश जाधव, विजयसोयाचे डायरेक्टर महावीर कोचेट्टा शिवरूद्र मुर्गे व बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे यांच्यासह कर्मचारी, व्यापारी व शेतकरी बांधवांसह स्वच्छता करून स्वच्छ बाजार समिती आवार अभियानाचा शुभारंभ केला.या अभियानात , अडतेव्यपारी, सचिन मलवाडे, सड्डू शरणापा ,विष्णु नंजिले,अशोक राचट्टे, महादेव कुचमे,जयराज औटी,विराज पाटील,बसू राचट्टे,देशमाने,सुभाष पवार,विजू राचट्टे हमाल, मापारी बाजार समिती चे कर्मचारी वाशीम शेख, भुजग सोमवंशी, सोमनाथ जाधव, रामेश्वर विभूते, महादेव कांबळे व इतर कर्मचारी आदींनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या