महामानवाच्या जयंती सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा...

 महामानवाच्या जयंती सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा...


 औसा प्रतिनिधी 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 134 व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम नगर बौद्ध नगर आणि समता नगर येथील जयंती समितीच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन सकाळी नऊ वाजता करण्यात आले आहे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण बुद्ध वंदना आणि त्रिशरण मंत्रोच्चारात महामानवाला अभिवादन करण्यात येणार आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा भीम गीतांचा कार्यक्रम चित्रकला निबंध स्पर्धा आणि सलग अठरा तास अभ्यासाचा अभिनव उपक्रम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम नगर बौद्ध नगर आणि समता नगर येथील जयंती समितीच्या वतीने महामानवाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक सायंकाळी सहा वाजता लातूर वेस्ट हनुमान मंदिरापासून मुख्य रस्त्यावरून काढण्यात येणार आहे तरी महामानवाच्या जयंती सोहळ्यानिमित्त अभिवादन सभा आणि मिरवणुकीत आंबेडकर प्रेमी बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जयंती समितीच्या वतीने करण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या