*आ.अभिमन्यू पवार औसा ते तुळजापूर नवसपूर्ती पदयात्रेत भेटून पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या..
औसा प्रतिनिधी
औशांचे आ. अभिमन्यू पवार यांच्या औसा ते तुळजापूर नवसपूर्ती पदयात्रेला 1जानेवारी नववर्षाच्या अनुषंगाने सुरुवात झाली होती..आज तिसऱ्या दिवशी औसा तालुक्यातील पत्रकार बांधवांसह कांक्रबा येथे भेटुन शुभेच्छा दिल्या... यावेळी पत्रकार संघ औसा तर्फे आमदार अभिमन्यू पवार यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप पक्षाचे पदाधिकारी अॅड परिक्षीत पवार, नगरसेवक समीर डेंग, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती प्रा.भिमाशंकर राचट्टे, गटनेते सुनिल उटगे, नगरसेवक ,गोपाळ धानुरे,सरपंच रामकृष्ण जाधव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवरही उपस्थित होते.त्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेचे दर्शन तुळजापूर येथे जाऊन घेतले याप्रसंगी पत्रकार संघाचे औसा तालुकाध्यक्ष प्रा. काशिनाथ सगरे सर, उपाध्यक्ष बालाजी उबाळे,गुरुधर्म चे संपादक रोहित हंचाटे, एकमत चे संजय सगरे,व्हाईस आॅफ मिडीयांचे तालुकाध्यक्ष राम कांबळे,लोकमत चे रमेश दुरुगकर.सकाळ चे विजयकुमार बोरफळे, दैनिक आनंद नगरी चे पांचाळ विठ्ठल, जेष्ठ पत्रकार रमेश शिंदे, मराठवाडा नेता चे विवेक देशपांडे,युट्यूब चॅनेल चे पाशा शेख,गिरीधर जंगाले,आदी मान्यवर उपस्थित होते*
0 टिप्पण्या