औशाच्या विकासासाठी मी आणि अभिमन्यूजी एकत्र आलोय..

 औशाच्या विकासासाठी मी आणि अभिमन्यूजी एकत्र आलोय..



माजीमंत्री बसवराज पाटील यांची ग्वाही.. 




औसा - मला या मतदारसंघात दहा वर्ष आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि या दहा वर्षांत याठिकाणी विकासकामे केली. त्या तुलनेत या पाच वर्षांत आमदार म्हणून अभिमन्यू पवार यांनी निश्चित अधिक कामे केली आहेत. हा तालुका विकासापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळे येथील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अभिमन्यू पवार यांच्यासारख्या आमदारांना याठिकाणी काम करण्याची संधी देण्याची गरज आहे. योगायोगाने राज्यात चांगले लोक एकत्र येऊन हे सरकार निर्माण झाले आहे. आणि औशात विकासासाठी मी व अभिमन्यू पवार एकत्र आलो आम्ही एकत्र येणे हा चांगला योग असून औशाच्या भविष्यासाठी पुन्हा अभिमन्यूजींना संधी द्यावे असे आवाहन माजीमंत्री बसवराज पाटील यांनी केले आहे. 



          महायुती चे अधिकृत उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ औसा तालुक्यातील मातोळा येथे (दि.१४) रोजी आयोजित प्रचार सभेत बोलताना केले. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, अॅड श्रीकांत सुर्यवंशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, प्रा सुधीर पोतदार, बसवराज धाराशिवे, हाणमंत राचट्टे, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, शिवाजी भोसले, संजय भोसले, दिनकर मुंगळे, तुराब देशमुख आदीसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना माजीमंत्री बसवराज पाटील म्हणाले की निवडणूक आली की मातोळा येथील लोकांना भेटावेसे वाटते एका वेगळ्या इतिहासाचे हे गाव असून वेगळी प्रेरणा या गावातून मिळाली आहे. त्यामुळे अभिमन्यू पवार व मी हि प्रेरणा व आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. एक चांगला विचार लोकांमध्ये मांडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला असून आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात चांगले विकासकामे केली जात आहेत. तुम्ही या काळात माझेही काम पाहिले आहे. या पाच वर्षांत आमदार अभिमन्यू पवार यांचेही काम पाहिले आणि आणखी दुसऱ्याचेही काम पाहिले आहे. त्यांचे नाव मी घेणार नाही असा टोला विरोधकांना लगावत एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार करून हा तालुका विकासाच्या पटरीवर ठेवण्यासाठी काम करणारी व्यक्ती निवडून देणेही काळाची गरज आहे. त्याच्याकडे आपण पाहावे अन्यथा आपण जर भरकटलो तर येणारी पिढी आपणाला माफ करणार नाही. हे स्पर्धेचे युग आहे. आपल्या तालुक्याचा विकास करून आपला तालुका समृद्धीच्या मार्गावर घेऊन जाण्याची गरज आहे. ते काम कधी घडते तुमच्या मतदानावरून घडते. त्यामुळे. हे मतदान म्हणजे अभिमन्यू पवार यांच्या विकासाला मतदान आहे. या मतदारसंघात माझी व अभिमन्यू पवार यांची कामातून व विचारातूनच ओळख निर्माण झाली आहे. म्हणून विकास आणि चांगल्या विचाराला प्रेम करणारे लोक याभागातील आहेत. असे सांगून अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे विकासाला मतदान, अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे सर्व धर्म समभाव ला मतदान, अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे एका चांगल्या लोकप्रतिनिधीला मतदान अभिमन्यू पवार यांना मतदान म्हणजे या लोकाभिमुख सरकारला मजबूत करण्यासाठी मतदान म्हणून आपले मत कुठेतरी वाया न जाऊ देता एका चांगल्या कामाला मतदानाच्या रूपाने या लोकशाहीला मदत झाली पाहिजे या सदसद्विवेकबुद्धीने स्मरून हे मतदान केले पाहिजे आणि मला खात्री आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या रूपाने एक विकासाच्या लोकप्रतिनिधी आपण प्रचंड बहुमताने निवडून देणार आहेत. असा विश्वास यावेळी बोलताना माजीमंत्री बसवराज पाटील यांनी व्यक्त केला. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या