औसा येथे निवडणूक खर्च निरीक्षकांकडुन उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची व्दितीय तपासणी
औसा प्रतिनिधी
औसा : 239 औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची व्दितीय ताळमेळ तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांनी दि.13.11.2024 रोजी केली व उमेदवार / प्रतिनिधी तसेच लेखा पथकातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.
औसा तहसील कार्यालयात बुधवारी डॉ. रामसिंह गुर्जर यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांचा निवडणूक खर्च ताळमेळ व तपासणी बैठक पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अविनाश कोरडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्री. घनशाम आडसुळ, सहायक खर्च निरीक्षक श्री. दत्ता बद्रुपे, नोडल अधिकारी खर्च संनियत्रण कक्ष श्री. राजु गुणाले व श्री. समद शेख, उपकोषागार अधिकारी श्री. अ.ना. झिंजुरे, यांच्यासह खर्च पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत औसा मतदारसंघातुन निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या अनुषंगाने ताळमेळ घेण्यात आला. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक यांनी उमेदवार / प्रतिनिधीना दैनंदिन खर्चाचे लेखे ठेवण्याबाबत व वेळीच खर्च सादर करण्याबाबत सूचना केल्या. सर्व उमेदवारांनी निवडणूक कामासाठी काढलेल्या बँक खात्यातुनच सर्व निवडणूक प्रचाराचा व परवाना घेतलेल्या वाहनांचा खर्च करण्याबाबत सूचना केल्या.
पुढील निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी दि. 17.11.2024 रोजी होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या