अँड .हाशम पटेल यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन..
औसा प्रतिनिधी
मराठवाडा साहित्य परिषद, शाखा लातूर आयोजित ॲड . हाशम पटेल लिखित *विश्वाचा आर्त गहिवर* या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दि . ८ सप्टेंबर २०२४ रोजी भालचंद्र ब्लड बँकेच्या सांस्कृतिक सभागृहात मराठवाडा साहित्य परिषद, छ.संभाजीनगर चे अध्यक्ष मा .श्री.प्राचार्य.कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रकाशन सोहळयाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कादंबरीकार प्रा.डॉ. शेषराव मोहिते हे होते, तर ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ . नागोराव कुंभार यांचा विशेष गौरव करण्यात आला . यावेळी महाराष्ट्रतील ज्येष्ठ विचारवंत डॉ श्रीपाल सबणीस (पुणे ), ज्येष्ठ कवी प्रा.फ .म .शहाजिंदे, विलास सिंदगीकर,जळकोट ( सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई ) कवी हशम पटेल, जयद्रथ जाधव ( सुप्रसिद्ध समिक्षक, लातूर ) आणि प्राचार्य .डॉ दुष्यंत कटारे (आंबेडकरी विचारवंत ,लातूर ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत / हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला . या प्रकाशन सोहळ्यासाठी पंचक्रोशितून मान्यवर अवर्जुन उपस्थितीत होते . त्यात मसापचे उपाध्यक्ष प्रा.किरण सगर ( उमरगा ), प्रा.डॉ.रामचंद्र काळुंखे ( छ. संभाजीनगर ), ज्येष्ठ कवी रमेश चिल्ले, प्रा.डॉ. भास्कर बडे ,योगिराज माने, नरसिंग इंगळे,देवदत मुंडे,रमेश हणमंते,सतिश सुरवसे, मारुती गायकवाड , विवेक सौताडेकर, शफी बोल्डेकर आदी . मान्यवर लेखक-कवी उपस्थित होते . या प्रकाशन सोहळयाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले . सूत्रसंचालन कवयित्री शैलजा कारंडे यांनी तर आभार प्राचार्य . डॉ.दुष्यंत कटारे यांनी मानले . या प्रकाशन सोहळ्यासाठी साहित्य रसिक मोठया संख्येने उपस्थित होते .
0 टिप्पण्या