उमर भाई पंजेशा मित्र मंडळ तर्फे नवीन मतदार नोंदणी व नांव दुरुस्ती शिबिर
औसा प्रतिनिधी
औसा येथील मोमीन गल्ली येथे उमरभाई पंजेशा मित्र मंडळ तर्फे एक दिवसीय नवीन मतदार नोंदणी व नांव दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने आज दिनांक 3 अॉगस्ट 2024 शनिवार रोजी मतदार यादी (भाग) क्रमांक नवीन 50 व जूने 49 क्रमांक मधील येणारे भाग मोमीन गल्ली,दंडीया गल्लीचा काही भाग,कापड गल्लीचा काही भाग,व फुलारी वाडा येथील नवीन मतदार नोंदणी व नांव दुरुस्ती शिबिर मोमीन गल्ली येथे घेण्यात आले.
या शिबिरात मतदारांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला.या शिबिरासाठी औसा नगरपरिषदेचे मतदार यादी भाग चे बी.एल.ओ.फरणविस चाऊस यांनी या शिबिराला सहकार्य केले.यावेळी या शिबिरात 90 मतदारांनी आपले नांव नोंदणी व नांव दुरुस्ती साठी या शिबिरात सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेतला.
हा शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उमर भाई पंजेशा मित्र मंडळचे यासीन करपुडे,आरेफ कुमारकीरी,मुबीन करपुडे, जिलानी (छोटू) हिप्परगे,महेदी सय्यद,जिलानी करपुडे, अल्ताफ करपुडे, महेदी मुल्ला, जावेद मुल्ला,आदिनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या