सोयाबीन अनुदानासाठी ई पिक पहाणीची अट रद्द करा -औसा शहर काँग्रेस कमिटीची मागणी
औसा प्रतिनिधी
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यसाठी असलेली ई-पिक पाहणीची अट रद्द करुन सरसकट शेतकऱ्यांना अर्थसहाय्य द्या.या मागणीसाठी औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ई-पिक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य घोषित करण्यात आला आहे. परंतु त्यात जे शेतकरी ई-पिक पाहणी करु शकले नाहीत अशांना सदरील अर्थसहाय्यापासुन वंचित राहत आहेत. ई-पिक पाहणी न करणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान झालेले आहे. म्हणून त्यांना सदरील अर्थसहाय्यापासुन वंचित ठेवता येत नाही. म्हणून सदरील अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी ई-पिक पाहणीच अट रद्द करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मंजुर करुन सरसगट शेतकऱ्यांना अनुदान द्या.अशी मागणी औसा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.यावेळी कॉग्रेस कमिटिचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष अजहर हाशमी, तालुका कार्याध्यक्ष अँड शाहनवाज पटेल, अँड फैय्याज पटेल, महिला तालुकाध्यक्ष सौ.सईताई गोरे,माजी नगरसेविका अँड मंजूषाताई हजारे, शहर कार्याध्यक्ष खुंदमीर मुल्ला,शहर कार्याध्यक्ष पुरुषोत्तम नलगे,मुज्मील शेख, जयराज कसबे,सय्यद अब्दुल खादर,शेख पाशा, सय्यद हमीद,नियामत लोहारे,अनीस जहागीरदार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या