शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषी मंत्र्यासोबत स्वतंत्र बैठक बोलवा..... ....शेतकरी संघटनेची औशाच्या आमदाराकडे मागणी

 शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषी मंत्र्यासोबत स्वतंत्र बैठक बोलवा.....

....शेतकरी संघटनेची औशाच्या आमदाराकडे मागणी 


औसा प्रतिनिधी 

औसा : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेले ठिबक तुषार अनुदान त्वरित मिळावे, गत वर्षाचा पीकविमा द्यावा, सरकारने जाहीर केलेले सोयाबीन अनुदान पीकपाहणीच्या अटीशिवाय सरसगट सर्व शेतकऱ्यांना द्यावे यासाठी राज्याच्या कृषी मंत्र्यासोबत आमची बैठक बैठक लावावी अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समितीच्या वतीने औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना देण्यात आले.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने संपूर्ण राज्यभर विविध प्रश्नावर आक्रमकपणे आंदोलने करण्यात आलेली आहेत. सोयाबीनला 10 हजार प्रतीक्विटल भाव द्यावा, कापसाला 12 हजार भाव द्यावा, पिकविमा द्यावा, कांद्याला भाव, दूध उत्पादकाच्या समस्या,उसउत्पादकांना न्याय मिळावा यासाठी महाआक्रोश मोर्चे, निराधार बंधुभगिनीच्या वाढीव मान धनासाठी संघर्ष असो की गावगाड्यातील लोकांसाठी व त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मंत्रालयाचा ताबा आंदोलन, नागपूर हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करुन श्री तुपकर यांच्या नेतृत्वात सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण दादा कुलकर्णी, राजीव कसबे यांच्यासह चळवळीतील कार्यकर्ते लढा देत असून सरकारचे चुकीचे धोरण शेतकऱ्यांचे मरण ठरत असल्याची भावना आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवास्थानी झालेल्या भेटीत राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी व्यक्त केली.यावेळी आ.श्री. पवार यांनी कृषी मंत्र्याशी निश्चित बोलेल असा विश्वास दिला.

आमच्या प्रश्नाच्या वेदना आम्हालाच कळतात त्यासाठी कृषी मंत्री यांच्यासोबत आमची विशेष बैठक आयोजित करुन शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि समस्या यावर धोरण आखावे तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.

भेटीदरम्यान राजेंद्र मोरे,राजीव कसबे,संपत गायकवाड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या