याकतपुर रोड, औसा येथे पाईपलाईन प्रस्तावित असताना रस्त्याचे काम बेकायदेशीपणे होत असून ते तात्काळ थांबवा-मनसेची मागणी

 याकतपुर रोड, औसा येथे पाईपलाईन प्रस्तावित असताना रस्त्याचे काम बेकायदेशीपणे होत असून ते तात्काळ थांबवा-मनसेची मागणी 


औसा प्रतिनिधी 

 ओसा शहरातील याकतपुर रोड येथे पाईपलाईन प्रस्तावित आहे व महाराष्ट्र शासनाने दि. २६/०२/२०२४ रोजी औसा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजुर केली आहे. त्यामध्ये याकतपुर रोड परिसरातील भागाचा समावेश आहे. बरेच मोठे काम या भागामध्ये होणे अपेक्षीत आहे असे असताना, कामाचा अग्रक्रम लक्षात न घेता रस्त्याचे काम केले जात आहे. त्यामुळे भविष्यात हा रस्ता खोदावा लागणार असून त्यामुळे शासनाचे कोटीचे नुकसान होत आहे. तसेच या रस्त्यामध्ये कच व डस्ट चा सरासपणे वापर केला जात आहे व  निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.व या शहरातील पाणी पुरवठा प्रकल्प मंजूर असतांना अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे केली जात आहेत.सध्या पाणी टंचाईही असताना शहरात अनेक कामे जोरात सुरू आहेत .हि कामे बेकायदेशीर आहेत .यामुळे  भविष्यात शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.पाईप लाईन हि रस्त्याच्या  दोन्ही भागातील घरासाठी आवश्यक बाब असते व ती रस्त्याच्या मध्यभागापासून घ्यावी लागते. तसेच औसा शहरातील भूमीगत गटारीचेही काम प्रस्तावित आहे व यामुळे भविष्यात हे रस्ते पुन्हा खोदावे लागणार आहेत.


तरी  सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अधिकारी साहेबांनी या प्रकरणी लक्ष देवून संबधीतांना योग्य त्या सुचना द्यावेत जेणे करुन शासन निधीचे अपव्यय होणार नाही व शासनाचा पैसा वाया जाणार नाही.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग औसा यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष प्रविण कठारे, अमोल  शिवाजी थोरात, निलेश भोजने, महेश बनसोडे,वैभव सुर्यवंशी आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या