औशात मांजरा महिला अर्बन शाखेचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते उद्घाटन
औसा प्रतिनिधी
मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या शाखेचा औसा येथे शुभारंभ पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते झाला असून ही मांजरा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही ग्राहकांच्या विनम्र व तत्पर आणि दर्जेदार सेवेत औसा शहरात सुरू झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य व सुसज्य जागेमध्ये ग्राहकांना दर्जेदार व तात्काळ सुविधा देण्याचा या पतसंस्थेचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. खातेदार ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता ही पतसंस्था ठेवीवर आकर्षक व्याज देणार आहे. तसेच मुदत ठेवीवर आकर्षक व्याजासह ज्येष्ठ नागरिक महिला व दिव्यांगांना अर्धा टक्का व्याजदर जास्त देण्यात येणार असून सोनेतारण कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अशी माहिती चेअरमन सौ.प्रियांका सुरवसे, व्हाईस चेअरमन सौ आर. एस. धायगुडे आणि बँकेचे कार्यकारी मुख्याधिकारी एस व्ही गंगापुरे यांनी यावेळी दिली.
मांजरा महिला अर्बन पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
औशाचे लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, शोभा पाटील, भाजप प्रवक्ता प्रेरणा होनराव, प्राचार्य भीमाशंकर राचट्टे , उद्योजक अमित सुरवसे,महिला मोर्चा अध्यक्ष रागिणी यादव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मल्टीस्टेटचे चेअरमन सुनील कांबळे, चाकूर अर्बनचे चेअरमन सुनील मासुमदार,सुनील उटगे हे उपस्थित होते. यावेळी दिनेश राजपूत ,विजयकुमार हुच्चै, लातूर मल्टीस्टेटचे सीवो श्रीशैल्य कोरे ,मॅनेजर भाग्यश्री साळुंखे ,सुनील आलापुरे ,विशाल सुडके, सानिया शेख, शारदा शिंगडे ,धनश्री लोंढे आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या