औसा शहरात झालेली अतिक्रमणे काढण्याची जोरदार मोहीम सुरू..

 औसा शहरात झालेली अतिक्रमणे काढण्याची जोरदार मोहीम सुरू..






औसा प्रतिनिधी 

 दि.22

औसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कोर्टासमोरील सर्वे नंबर 88 मधील जागेमध्ये असलेल्या अतिक्रमणाबद्दल मागील अनेक दिवसापासून तक्रारी सुरू होत्या तसेच सदरील जागेवर औसा नगर परिषदेने व्यापारी संकुल विकसित करण्यासाठी आरक्षण क्रमांक 53 नुसार ही जागा आरक्षित केली होती. नगरपरिषदेच्या विकास आराखड्यामध्ये आरक्षण क्रमांक 53 मध्ये 27 गुंठे गायरान जागा आरक्षित केली असल्याने या जागेतील आरक्षणावर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पोलीस संरक्षणामध्ये बुलडोझर फिरवून येथील अतिक्रमण काढण्यात आले. तहसीलदार औसा यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे व वाहनांचे सहाय्य घेऊन तीन जेसीबीच्या सहाय्याने या परिसरातील संपूर्ण अतिक्रमण काढल्याने येथील व्यवसायिकांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या परिसरात झालेले अतिक्रमण काढत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. औसा महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी दीपक भुजबळ, औसा सज्जाचे तलाठी विकास बिराजदार आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी व अनेक कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. सर्वे नंबर 88 मधील 27 गुंठे गायरान जागेतील अतिक्रमण संपूर्णतः काढण्यात आले तर ग्रामीण रुग्णालयाच्या समोर अब्दुल कलाम आझाद चौक कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले आणि व्यवसायिकांनी दुकाने लावून केलेले अतिक्रमण ही काढण्यात आले आहे. बाजार रोड वरील हनुमान मंदिरा जवळ असलेले आणि मुक्तेश्वर रोड वरील पूर्व बाजूच्या अतिक्रमणानंतर 22 डिसेंबर रोजी सर्वे नंबर 88 मधील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविण्यात आला. औसा शहरात झालेली अतिक्रमणे काढण्याची जोरदार मोहीम सध्या सुरू असल्याने नागरिकात घबराट पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या