विकसित भारत संकल्प यात्रेतून जनजागृती ...

 विकसित भारत संकल्प यात्रेतून जनजागृती ...





औसा प्रतिनिधी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समाजातल्या अंतिम परिवारापर्यंत विकास पोहोचविता यावा आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदय योजना साकार करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या योजनांचा थेट जनतेपर्यंत लाभ मिळविता यावा म्हणून शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची माहिती विविध खात्यामार्फत पोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. संकल्प भारत विकास यात्रेचे आयोजन करून या विहांच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना विविध घरकुल योजना पी एम स्वनिधी, पीएम किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत नागरी भागामध्ये अत्याधुनिक शौचालयाची निर्मिती दर्जेदार आरोग्य सुविधा व वेगवेगळ्या खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना सह शेतकरी वर्गाला आवश्यक असणाऱ्या विविध योजना तसेच विश्वकर्मा योजनेतून कारागीर बांधवांना अर्थसाह्य अशा विविध योजनांची माहिती मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून एलईडी स्क्रीन द्वारे जनतेपर्यंत देण्यात येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड करणे तसेच लाभार्थ्यांना सदर योजना मिळाल्या किंवा नाही याची माहिती घेणे तसेच प्रलंबित योजना तात्काळ लाभार्थ्यांना मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करणे व सदर योजना प्राप्त करून घेण्यासाठी असलेल्या त्रुटीची पूर्तता करणे अशा सर्व बाबींची माहिती विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. शनिवार दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी औसा नगर परिषदेच्या वतीने लातूरवेस हनुमान मंदिराजवळ भव्य मंडप टाकून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जनतेमध्ये एलईडी स्क्रीन द्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार बाजपाई, ॲड मुक्तेश्वर वागदरे, अँड अरविंद कुलकर्णी, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगराध्यक्ष किरण राज शेखर उटगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती भीमाशंकर राचट्टे ,सूर्यकांत शिंदे, भारतीय जनता पार्टीचे औसा मंडळाचे अध्यक्ष सुनील उटगे, बंडू कोद्रे, गोपाळ धानुरे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अजिंक्य रणदिवे आदि मान्यवरांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औसा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या