तेजस धनागरे यांना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आयआयटी कॉलेजचे सुवर्णपदक...

 तेजस धनागरे यांना उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आयआयटी कॉलेजचे सुवर्णपदक...




औसा/ प्रतिनिधी : -


 औसा येथील अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. नरसिंग  धनागरे यांचे सुपुत्र तेजस नरसिंग धनागरे यांना भारतीय प्रौद्योगीकी संस्थान, भारतीय खनि विद्यापीठ धनबाद झारखंड अंतर्गत आयआयटी इंजीनियरिंग अभ्यासक्रमाचे सुवर्णपदक देशाचे महामहीम उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते धनबाद झारखंड येथे प्रदान करण्यात आले. यावेळी झारखंड राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, झारखंड राज्याचे आरोग्यमंत्री बत्रा गुप्ता, आयआयटीचे चेअरमन प्रो. प्रेम व्रत आणि निदेशक जे के पटनायक आदी मान्यवर उपस्थित होते. तेजस धनगरे याने धनबाद येथील आयआयटी कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागांमध्ये सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचा बहुमान उंचावला आहे. तेजस धनागरे यांच्या या उज्वल यशाबद्दल अजीम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य निजामुद्दीन शेख, प्रा. बाळासाहेब कदम, प्रा. बी आर पाटील, प्रा.  जाधव, काका नरसिंग भंडे (अधिक्षक अभियंता धाराशिव), आई सौ. शिवनंदा धनागरे, जयराम वाखरडे(उप अभियंता) सौः ऐश्वर्या वाखरडे आणि सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या