प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी हप्ता अनुदानाच्या प्रतीक्षेत
औसा प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात देशवासीयांना 2022 सालापर्यंत सर्व बेघरांना घरे देण्यासाठी ची संकल्पना लोकांशी प्रकल्प म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने अनेक लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजने मधून घरकुल योजनेसाठी औसा नगर परिषदेकडे अर्ज केला आणि आणि लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम केले परंतु शेकडो लाभार्थी यांना बांधकामाचे केवळ तीन हप्ते मिळाले आहेत. अनेक लाभधारकांनी घराचे बांधकाम पूर्ण केले असून नगर परिषदेकडे चौथ्या हप्त्याच्या अनुदान मागणीसाठी रीतसर कागदपत्र देऊन अर्ज केला आहे परंतु प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभधारकांना चौथ्या हप्ता अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने अनेक लाभधारकांची आर्थिक कोंडी निर्माण झाली असून या बाबीकडे नगरपालिकेचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी या कामी लक्ष घालून प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभधारकांना चौथा हप्ता व ज्यांच्या घराचे बांधकाम पूर्ण झाले आहेत अशा लाभधारकांचा सविस्तर अहवाल मागून फायनल हप्ता अनुदानाची रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यात वर्ग करावी अशी मागणी होत असून प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी हप्ता अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने लाभधारकांमध्ये नाराजीचा सूर येत आहे.
0 टिप्पण्या