सर्वांच्या सहकार्याने किल्लारी सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल -स्वामी नरेंद्राचार्य महाराज
औसा प्रतिनिधी
किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा 40 वा गळीत हंगामाचा स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्वामी नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की आजारी अवस्थेतील किल्लारी कारखाना आमदार अभिमन्यू पवार यांनी उर्जितावस्थेत आणून त्याला सुरू करीत आहे.त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने सहकार्य करीत तो कारखाना जीवन ठेवायचा आहे.आमदार अभिमन्यू पवार हे देवेंद्रजीचे शिष्य असल्याने किल्लारी साखर कारखाना पारदर्शकपणे चालवतील असा विश्वास आहे.अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभा राहिल्याने हा कारखाना सुरू होत असून त्याला संजीवनी मिळाली आहे.आता हा कारखाना टिकविण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे हा कारखाना तुमचा आहे. जेव्हा किल्लारी बंद होता तेंव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणी वाली नव्हता त्यावेळी शेतकऱ्यांनी मालकतोड करून ऊस घेऊन जावा लागला आता आमदार अभिमन्यू पवार व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी किल्लारी कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा म्हणून सहकारी तत्त्वावर सुरू केला आहे.तो जीवंत कसा ठेवायचा यासाठी सर्वानी प्रयत्न करावा जेणेकरून किल्लारीसह तालुक्यातील विकासाला चालना मिळेल.यामध्ये कोणीही राजकारण आणू नये.कारण सर्वाच्या सहकार्याने किल्लारी सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल.
असे सांगून ते म्हणाले की आमदार अभिमन्यू पवार व माझे नाते वेगळे असून ते माझे लाडके आहेत.या भागाच्या विकासासाठी सर्वानी त्यांच्या पाठीशी उभे राहावे.कारण या भागाच्या विकासासाठी सत्ता आवश्यक आहे.अभिमन्यू यांच्याकडे दुष्टी आहे आणि ती दुष्टी घेऊन ते काम करतात यावेळी पाचवे पीठापती नाथ संस्थान औसा हभप गुरुबाबा महाराज औसेकर, माजी खासदार रवींद्र गायकवाड, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे,हभप दतात्रय पवार गुरुजी, संताजी चालुक्य,सौ.शोभा अभिमन्यू पवार सरपंच सौ.सुलक्षणा धनराज बाबळसुरे व शेतकरी सभासद ,यांच्यासह स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक आर.एस.बोरावके यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड श्रीधर जाधव यांनी केले .
0 टिप्पण्या