*अजित दादांची औसा शहरास दसरा भेट*
*औसा शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी*
जुन्या व नवीन हद्दवाढ वस्तीतील पाण्याचा प्रश्न मिटणार
*राष्ट्रवादीने तयार केलेल्या औसा वाढीव पाणी पुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी*
औसा: तब्बल 35 वर्षांपासुन प्रलंबीत असलेल्या औसा शहराची हद्दवाढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्याखालील असलेल्या औसा नगरपालिकेत दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी झाली. या वाढत्या वस्त्यांच्या व शहरीकरणाच्या भागात नवीन पाईपलाईन करणे ही गरज लक्षात घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना पुढे आणली त्याचबरोबर जुन्या शहरातील काही भागाच्या नळाला कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या त्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचं असं पाऊल आहे. दि 23 आक्टो रोजी मुख्य अभियंता, मजिप्रा छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयाने यासंबंधीचे तांत्रिक मंजुरीचे आदेश निर्गमित केले आहे.
औसा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने दिनांक 14 जून 2021 आली विषय क्र दोन अन्वये सदरच्या वाढीव वितरण व्यवस्था च्या ठरावास मंजुरी दिली होती, त्यामध्ये शहरातील जुन्या वस्तीमध्ये व नवीन हद्दवाढवस्तीत अनेक सुधारणात्मक कामे तसेच नवीन जलकुंभ, जुन्या शहरात कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठा पाणीपुरवठा, पाईपलाईन मधील दोष व अडचणी इत्यादी सह अनेक बाबींचा समावेश करून ठराव पारित करण्यात आलेला होता.
2021 साली औसा नगरपालिकेने वैष्णवी कन्सल्टींग एजन्सी लातूर यांना या कामासंबंधी सविस्तर असे सर्वे व डीपीआर तयार करण्याचे आदेश पारित केले होते व यासंबंधी निविदा प्रक्रिया ही पूर्ण करून आवशयक कार्यादेश ही देण्यात आलेले होते. त्यानुसार सदर एजन्सीने शहरातील नवीन हद्दवाढ वस्तीत व जुन्या शहरात सर्वे प्रारंभ केला होता त्यामध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अफसर शेख व पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, माजी नगराध्यक्ष श्री जावेद शेख यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत शहरातील पाण्यासंदर्भातील अडचणी सर्वेकरांच्या स्वतः सोबत राहून त्यांच्या नजरेस आणून दिलेल्या होत्या व सदर तयार झालेल्या सर्वे/ डीपीआर चे औसा नगरपालिका येथे सर्व पत्रकार, शहरातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक व नगरसेवक यांच्या समवेत झालेल्या महा. जीवन प्राधिकरण च्या बैठकीत प्रेझेंटेशनचे सादरीकरण झाले होते व यामध्ये अनेक त्रुट्या ह्या दुरुस्त करण्यात आलेल्या होत्या.त्याच वेळेस
सदर प्रस्ताव मजिप्रा कार्यालयास तांत्रिक मान्यतेसाठी (अंदाजपत्रकीय किमत 37.49कोटी) सादर करण्यात येऊन त्यास आवश्यक असणारी तांत्रिक फी ही भरण्यात आली व व सदर या प्रस्तावात साधारण 200 च्या वर लहान मोठ्या त्रुट्या दर्शविण्यात आलेल्या होत्या व त्याची पूर्तता ही नगरपालिकेकडून त्याच वेळेस करण्यात आली.
दि 11 डिसेंबर 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी औसा येथे औसा नगरपालिकेच्या लोकार्पण शासकीय सोहळ्यामध्ये सदर नवीन पाणीपुरवठा योजनेस 37 कोटी इतके निधी मजूर करण्याचे जाहीर आश्वासन ही अफसर शेख यांच्या विनंतीवरून दिले होते. श्री अजित पवार हे सद्या राज्याचे अर्थ व उपमुख्यमंत्री म्हणून कारभार करीत असताना, अफसर शेख यांनी सदर प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत त्यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू ठेवला होता व यावर श्री अजित पवार यांनी संबंधित विभागास सदर योजनेस तांत्रिक मान्यता देण्याचे आदेश ही अफसर शेख यांच्या विनंतीवरून दिले होते. प्रयत्नाअंती सदर प्रस्तावास मजीप्रा कार्यालय कडून तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे, ज्याची अंदाजपत्रकीय किंमत ही 43.04 कोटी इतकी आहे.जुन्या प्रस्तावातील (जुनी किमत 37.49कोटी) दरामधील नवीन फरकानुसार सदर मान्यता मधे साडे पाच कोटी ची वाढ झाली आहे व या व्यतरिक्त इतर कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे तत्कालीन औसा चे लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी सांगितले.
0 टिप्पण्या