सौ. वैजयंता सरवदे (काळदाते)यांचा सेवापुर्ती निमित्त सत्कार संपन्न
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा द्वारा संचलित महाराष्ट्र विद्यालयातील सहशिक्षिका सौ वैजयंता आप्पाराव सरवदे (काळदाते)आणि मुख्याध्यापक जी. एन. पाठक हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल निलंगा येथील गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड आणि संस्थेचे सचिव बब्रुवान सरतापे आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करून सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ पार पडला. महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मातोश्री सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमासाठी जी. एन. पाठक आणि सौ. वैजयंती आप्पाराव सरवदे ( काळदाते)यांचे नातेवाईक व महाराष्ट्र शिक्षण समितीच्या अनेक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक जी.एन. पाठक यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून एक्वा वॉटर फिल्टर प्लांट भेट देण्यात आला. संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रारंभी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापक व सहशिक्षिका यांच्या सेवापुर्ती सोहळ्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र विद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक जी.एन. पाठक आणि सौ. वैजयंती सरवदे (काळदाते) यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या