हिप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल कांबळे यांची बिनविरोध निवड

 हिप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल कांबळे यांची बिनविरोध निवड



हिप्परसोगा (ता. औसा) | दि. ७ ऑगस्ट २०२५


मौजे हिप्परसोगा गावातील सामाजिक व युवकांमध्ये लोकप्रिय असलेले शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीचे युवा नेतृत्व श्री. विशाल साहेब कांबळे यांची दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी हिप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.


ही निवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तेलंग साहेब यांच्या उपस्थितीत नियमानुसार पार पडली. निवडीनंतर माजी उपसरपंच भामाबाई आळंदकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


या वेळी ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा गोरे, मिरा चेवले, मुदरीकाबाई यादव, आकाश सोमवंशी, बळवंत आळंदकर, तसेच गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष बालाजी संभाजी सोमवंशी, पोलीस पाटील बालाजी कांबळे, विठ्ठल सोमवंशी, धनराज सोमवंशी, सचिन कांबळे आणि गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उत्कृष्ट वक्तृत्व, जनसंपर्क आणि प्रामाणिक नेतृत्वगुण असलेले श्री. विशाल कांबळे हे सामाजिक समतेसह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या