शिक्षण *शक्तिशाली साधन - सौ. जरीना बागवान
औसा प्रतिनिधी
लातुर - रुकय्या बेगम हायस्कूल विद्यालय येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर सौ जरीना बागवान (API ) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्राचार्य याहय्या कसेरी, प्रा. महेफुससर ( निवृत्त ) श्रीमती नाजेमा अब्बास शेख , जूनैदी सर , असिफ बागवान, युसूफ सर मुख्याध्यापक प्राथमिक यांची उपस्थिती होती आपल्या भाषणात
पुढे बोलताना सौ जरीना बागवान म्हणाल्या की शिक्षण हे मानव जीवनातील सर्वात मौल्यवान आणि शक्तिशाली साधन आहे. शिक्षणामुळे माणसाच्या जीवनात ज्ञान, प्रगती आणि समृद्धी येते. शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व घडते, विचारशक्ती विकसित होते आणि समाजात योग्य स्थान मिळते.शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर अनुभवातून मिळणारे जीवनाचे खरे आकलनही आहे. शिक्षणामुळे माणूस चांगल्या वाईटाचा विचार करू शकतो, निर्णयक्षमता वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. अशिक्षित माणूस अंधश्रद्धा, अज्ञान आणि दारिद्र्यात अडकलेला असतो, तर सुशिक्षित माणूस विज्ञानवादी, जागरूक आणि प्रगतीशील असतो.
शिक्षणामुळे समाजाचा विकास होतो. शिक्षित लोक समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करतात. शिक्षणामुळे बेरोजगारी कमी होते आणि आर्थिक उन्नती घडते. म्हणूनच प्रत्येक मुलाला, मुलींना शिक्षण मिळणे हक्काचे आणि गरजेचे आहे.आज भारत सरकार "सर्व शिक्षण अभियान", "बेटी बचाओ, बेटी पढाओ" अशा योजना राबवत आहे, ज्यामुळे मुला-मुलींना समान संधी मिळू शकते. शिक्षणानेच देशाला विकसित राष्ट्र बनवता येते
शिक्षण हे जीवनाचे आधारस्तंभ आहे. शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही. म्हणून "विद्या विनयेन शोभते" ही म्हण आपण लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा लाभ घ्यावा आणि समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचा प्रसार करावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती नाजे़मा बेगम अब्बास शेख यांनी सूत्रसंचालन प्रा.महेफुस सर यांनी केले आभार जूनैदीसर यांनी मानले कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, सहाय्यक, सेवक, पालक, विध्यार्थीनी, विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
0 टिप्पण्या