AIMIM चा भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा — हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.. अँड गफुरूल्ला हाश्मी
औसा, 3 ऑगस्ट (प्रतिनिधी):
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने लातूरमध्ये एक भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा बुधवार, दि. 6 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:00 वाजता, मयुरा लॉज रेसिडेन्सी, अंबाजोगाई रोड, एसपी ऑफिसजवळ, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा AIMIM महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार आणि लातूर जिल्हा निरीक्षक फिरोज लाला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.
आगामी जिल्हा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचार, प्रसार व संघटनात्मक बांधणीसाठी हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असून, या बैठकीत जिल्हा, तालुका आणि शहर पातळीवरील आजी-माजी पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व नवमतदारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
औसा तालुक्याचे AIMIM प्रमुख ॲड. गफरुल्लाह हाश्मी यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि AIMIM समर्थकांनी या महत्त्वपूर्ण संवाद मेळाव्यास वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
0 टिप्पण्या